🕒 1 min read
भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओत त्या लग्नात नाचताना दिसत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओत त्या फुटबॉल खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओंच्या माध्यमातून विरोधी पक्ष काँग्रेसकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, २००८ सालच्या मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपींपैंकी एक असलेल्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तब्येतीच्या कारणास्तव कोर्टात उपस्थित राहू शकत नसल्याचे म्हटले होते. नेहमीच व्हीलचेअरवर दिसणाऱ्या साध्वी प्रज्ञा या व्हिडिओत मात्र नाचताना आणि मैदानात बास्केटबॉल खेळताना या व्हिडिओत दिसत आहे.
https://twitter.com/NarendraSaluja/status/1412772711269498882
नव्या व्हिडिओत प्रज्ञा ठाकुर या डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. प्रज्ञा ठाकुर यांच्या निवासस्थानी या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन गरीब मुलींच्या लग्न त्यांनी लावून दिलं. या कार्यक्रमात प्रज्ञा ठाकुर यांनी ठेका धरला होता. त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांनाही नाचायला बोलवताना त्या या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी शेअर केला आहे.
‘आमच्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकुर यांना जेव्हा कुणाचीही मदत न घेता बास्केटबॉल खेळताना पाहतो तेव्हा आनंद होतो. आतापर्यंत हे कळू शकलं नाही त्यांना नेमकं काय झालं आहे?. मात्र त्यांना आता नाचताना पाहिलं आणि आनंद झाला. ईश्वर त्यांना चांगले आरोग्य देवो”, असा टोमणा काँग्रेस नेते सलूजा यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊत यांची मतं स्ट्राँग आहेत’, ‘सामना’च्या अग्रलेखावर पंकजा मुंडेंचे भाष्य
- ‘पंकजा मुंडेंना संपूर्ण खतम करण्यासाठीच कराडांना मंत्रिपद’, ‘सामना’तून शिवसेनेचा दावा
- बीड, उस्मानाबादच्या हक्काच्या पाण्यासाठी आ.धस यांनी विधिमंडळात उठवला आवाज
- ‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी
- बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
