Share

बुडाखाली अंधार! भाजप आ.लक्ष्मण पवार यांचा नगरसेवकच निघाला वाळूमाफिया

Published On: 

बीड : भाजप नगरसेवकाने वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक पोलीस आणि महसूल पथकाच्या ताब्यातून धुडगूस घालत पळवल्याची घटना गेवराई तालुक्यातील रांजणी जवळ मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे. आरोपींमध्ये भाजप नगरसेवक राहुल खंडागळे याच्यासह तिघांचा समावेश आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक विरोधात गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे सातत्याने आवाज उठवत आंदोलन करत आहेत. गेल्या अधिवेशनात त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून उपोषणही केले होते. पण आता त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक वाळूमाफिया असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे.

गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी पात्रात माफिया वाळूचा सर्रास उपसा करून रातोरात वाळूची तस्करी करत आहेत. वाळू घेऊन भरधाव जाणाऱ्या हायवामुळे अपघात घडत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दोन महिन्यांपूर्वीच तालुक्यातून हायवातून वाळू वाहतुकीस बंदी घातली आहे. परंतु, या आदेशाला वाळू माफिया पायदळी तुडवत सर्रास वाळू वाहतूक करताहेत. राक्षसभुवन, सुरळेगाव, पांचाळेश्वर राजापूर, हिंगणगाव, संगमजळगाव, राजापूर, बोरगाव बु., म्हाळसपिंपळगाव, नागझरी, खामगाव या गावांतील गोदापात्रातून वाळूची हायवातून वाहतूक होत आहे. तहसीलदार खाडे हे मंगळवारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जात होते

मंगळवारी सकाळी वाळुची वाहतूक करणारा हायवा ट्रक हा राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली. तहसीलदार खाडे लागलीच तलाठी परम काळे यांना घेऊन गढीच्या दिशेने रवाना झाले. तहसीलदार यांनी हायवा ट्रकचा पाठलाग करत रांजणी येथे रोखला. यातील वाळू विना रॉयल्टी विक्रीसाठी जात असल्याचे चालकाच्या चौकशीतून स्पष्ट झाले. तहसीलदारांनी लागलीच पोलिसांना याची माहिती देऊन ट्रक जप्त करण्यास सांगितले.

दरम्यान, चालकाने फोनवरून ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती एकास दिली. यानंतर तेथे एका जीपमधून भाजप नगरसेवक राहुल खंडागळे आणि इतर दोघे आले. तिघांनी तहसीलदार खाडे आणि तलाठी काळे यांच्यासोबत ट्रक पकडण्यावरून हुज्जत घातली. तसेच पोलीस ट्रक घेऊन जात असताना त्यांना धमकावले. ऐवढ्यावरच न थांबता खंडागळे आणि त्याच्या साथीदाराने महसूल आणि पोलिसांच्या ताब्यातील ट्रक तेथून पळवला. याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक राहुल खंडागळे याच्यासह तीन जणांवर बुधवारी रात्री तलाठी परम काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!