Share

‘बाळासाहेबांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री केले होते’, दरेकरांचा राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे.

यावरून ‘राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

‘संजय राऊत यांना राणेंना काही मिळाले तरी ते छोटेच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणेंची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले होते. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाचा काविळ झाल्याचा टोला दरेकरांनी लगावला. तसेच राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे,की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणे त्यांच्या कार्यपद्धतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं, असा विश्वासही यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला.

नारायणे राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर
‘संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचेच असतं. चांगले नाही वाईटच बोलायचे असते. संजय राऊत यांना सांगेन की खाते बरे-वाईट नसते, तर काम कसे करतो हे महत्वाचे असते. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खाते चांगले आणि मोठे होते असे म्हणतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!