Share

मंत्रिपद नाकारल्याने मुंडे भगिनी नाराज? ‘महाराष्ट्र देशा’च्या बातमीनंतर भाजपने दिले स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली होती. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला बळ मिळाले. याबाबत महाराष्ट्र देशाने याचे विश्लेषण करणारे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या नाराजी नाट्यावर भाष्य केले आहे.

लोकसभेत दोन वेळा विक्रमी मतांनी विजय, उच्चशिक्षीत आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी समर्थकांची अपेक्षा होती. पण, ज्या गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे डॉ. भागवत कराड यांना महापौरपदाची संधी मिळाली त्यांनाच आता मुंडेंऐवजी केंद्रात संधी मिळाली. यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खा.प्रितम मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

कारण, या दोन्ही भगिनींनी अद्यापपर्यंत मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवाय कराड यांच्यासह नुतन मंत्र्यांचेही अभिनंदन केलेले नाही. एरवी सोशल मीडियाद्वारे नेहमी सक्रिय असणाऱ्या मुंडे भगिनींनी मंत्रिमंडळ विस्तारावर कोणतीही पोस्ट केली नाही. काल बुधवारी फक्त पंकजा मुंडे यांनी आपण मुंबईतच असल्याची माहिती देणारे ट्विट शेअर केले. तेच ट्विट प्रीतम मुंडे यांनी रिट्विट केले. त्यानंतर दिवसभर घडलेल्या घडामोडींवर मुंडे भगिनींनी काहीही भाष्य केले नाही. शिवाय माध्यमांनाही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्या दोघीही नाराज असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.

यावर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल’. दरम्यान, दरेकरांनीही नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत काय चाललंय याचा राजकीय विश्लेषकांनी अदमास घेणे सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!