Share

‘मुख्यमंत्री ठाकरेंनी नाही, पण शरद पवारांनी फोन करून शुभेच्छा दिल्या’, मंत्री राणेंची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे. राणे यांनी आपल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारला असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

‘शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की चांगले काम करा. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढे मोठे नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. पण महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो’, अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

संजय राऊतांचा घेतला समाचार
राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. यालाही राणेंनी प्रत्युत्तर दिलेय. ‘संजय राऊत यांना काही ना काहीतरी बोलायचेच असतं. चांगले नाही वाईटच बोलायचे असते. संजय राऊत यांना सांगेन की खाते बरे-वाईट नसते, तर काम कसे करतो हे महत्वाचे असते. या खात्याला मी जेव्हा न्याय देईन तेव्हा संजय राऊतच हे खाते चांगले आणि मोठे होते असे म्हणतील,’ असा टोला राणे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!