Share

क्रीडामंत्रीपदी नेमणुक झाल्याबद्दल भज्जी आणि शास्त्रींनी केले अनुराग ठाकुर यांचे अभिनंदन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बुधवारी ७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला. या वेळी तब्बल ४३ मंत्र्यानी शपथ घेतली. यात ३६ नव्या मंत्र्याना पहिल्यांदा पदभार देण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी क्रीडामंत्री पदावर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांची नेमणुक केली.

अनुराग ठाकुर यांची क्रीडामंत्रीपदावर नियुक्ती होताच भारताचा माजी क्रिकेटपटु हरभजन सिंग आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांचे आभिनंदन केले आहे. हरभजनने ट्विट करत म्हणले आहे की,’तरुण, उत्साही आणि खेळाबद्दल आपुलकी यासह क्रीडा प्रशासनाचा चांगला अनुभव. यापेक्षा उत्तम क्रीडामंत्री पंतप्रधान मोदी यांनी निवडला नसता. खुप खुप अंभिनंदन’ असे ट्विट केले.

तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘बीसीसीआयचे माजी अध्यक्षाची केंद्रीय मंत्रीमंडळात क्रीडामंत्री पदावर नेमणुक झाल्याचे बघुन खुप चांगलं वाटलं. अभिनंदन अनुराग ठाकुरजी’ असे ट्विट केले आहे. अनुराग ठाकुर हे मे २०१६ ते फेब्रुवारी २०१७ कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यापुर्वी त्यांनी बीसीसीआयचे सचिव आणि हिमाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भुषवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!