Share

नाबाद ३७ धावांची झुंझार खेळी करत आमलाने रोखला काऊंटी स्पर्धेतील पराभव

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमला हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत तो सरे संघाकडुन खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या हॅम्पशायर संघाविरुद्ध आमलाने झुंझार खेळी करुन संघाचा पराभव टाळला.

हॅम्पशायर संघाने सरे संघाला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात ८ धावांत दोन गडी गमावल्यानंतर हाशिम आमला फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. संपुर्ण दिवस आमला खेळपट्टीवर ठाण मांडुन बसला होता. दिवसभर फलंदाजी करताना त्याने तब्बल २७८ चेंडुचा सामना केला. मात्र इतक्या चेंडुचा सामना करताना केवळ ३७ धावा जोडल्या. या खेळीत त्याने ५ चौकार मारले. आमलाच्या या झुंझार खेळीमुळे सरे संघाने हा सामना यशस्वीपणे अनिर्णीत राखला.

या खेळीत आमलाने एका विक्रमाची नोंद देखील केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४० पेक्षा कमी धावा करण्यासाठी सर्वाधीक चेंडु खेळण्याचा विक्रम केला आहे. यापुर्वी आमलाने भारताविरुद्ध अशीच झुंझार खेळी केली आहे. भारताविरुद्धच्या त्या सामन्यात आमलाने २४४ चेंडुत केवळ २५ धावांची खेळी साकारली होती. त्याच्यासोबत त्याचा सहकारी एबी डीव्हिलीयर्सने २९७ चेंडुत ४३ धावा केल्या होत्या आणि पराभव टाळला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!