Share

‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. दोन दिवसांच्या अधिवेशनात देखील अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून काही काळ सभागृहाचे कामकाज देखील तहकूब करण्यात आले होते. तर, या गोंधळानंतर असंसदीय शब्द वापरत धक्काबुक्की केल्याचा आरोप करत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांच्या निलंबनाला मान्यता दिली.

त्यानंतर १ वर्षासाठी निलंबन केलेले भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. ‘विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ झाली हे सत्य आहे, ती कोणी केली हे उघड करण्यासाठी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मी राज्यपालांकडे करणार आहे. शिवीगाळ करण्याचा इतिहास कोणाचा आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे’. असा थेट आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचे निलंबित झालेले १२ आमदार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झालेले आहेत. आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या प्रकाराची तक्रार करण्यासाठी हे आमदार राजभवनावर दाखल झालेले आहेत.

भाजपच्या डझनभर आमदारांचे निलंबन 

याच पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. या निलंबनानंतर भाजप नेते कामकाजावर बहिष्कार टाकत सभागृहातून बाहेर आले. गिरीश महाजन, आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत, किर्तीकुमार बागडीया या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांना पुढील एक वर्षासाठी विधानसभेच्या मुंबई किंवा नागपूरच्या एकाही कामकाज सहभाग घेता येणार नाही.

नेमका गोंधळ काय ?

ओबीसी आरक्षणासाठीच्या इम्पिरीकल डाटा केंद्राकडून मिळावा यासंदर्भात एक प्रस्ताव आज मंत्री छगन भुजबळ यांनी मांडल्यानंतर तो सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, हा ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. तर, तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!