🕒 1 min read
मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष पिंपळे, नारायण कुचे, बंटी भांगडीया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला आहे.
संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता भाजपने महाविकास आघडीवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘आघाडीच्या नेत्यांनी केलेला दावा चुकीचा आहे, ज्या पद्धतीने विरोधक आक्रमक होऊन सरकारचे कपडे काढत आहे, किंबहुना सरकार दीड वर्षात अपयशी झाल्याचे मुद्दे विधीमंडळात मांडत आहे. या सरकारला कोणत्याही विषयावर चर्चा नको. मराठा आरक्षणावर चर्चा नको, ओबीसी राजकीय आरक्षणावर चर्चा नको. आज एमपीएससीचे प्रश्न प्रलंबित आहेत. MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुणे येथे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली.
आज विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. या सर्व असंतोषाला वाचा फोडण्याचे काम भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून करत आहे. सरकारची अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला असणारे जनतेचे प्रश्न या सगळ्यांचा सरासर कट करून नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे.’ असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी ओबीसी आरक्षणावरून राजकारण करू पाहणाऱ्या भाजपची सभागृहात अक्षरशः पिसे काढली
- ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदार पणाला लावू; देवेंद्र फडणवीसांची गर्जना
- ‘राष्ट्रवादीचा बहुरूपी सांता क्लॉज मोदींवर खोटे आरोप करत होता’; भाजप नेत्याची खोचक टीका
- भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन
- ठाकरे सरकारचं ठरलं ; ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
