🕒 1 min read
बुलडाणा: मृग नक्षत्र कोरडे गेल्याने काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या तर काही ठिकाणी झालेली पेरणी झालेली पिके पावसाच्या दडी मुळे धोक्यात सापडले होते. मात्र २८ जूनच्या पावसाने जिल्ह्यात दमदार एंट्री केली त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रफळा पैकी सुमारे ४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली असून जिल्ह्यात सुमारे ६६ टक्के इतकी पेरणी आतापर्यंत झाली आहे.
खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या होत्या, जिल्ह्यात ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २१ जून पर्यंत तीन लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, काही शेतकऱ्यांनी पावसाच्या सुरुवातीला म्हणजेच मृग नक्षत्रात पेरणी आटोपली होती मात्र पाहिजे तसा पाऊस न झाल्यामुळे पेरणी करणारे शेतकरी दुबार पेरणीच्या संभाव्य संकटामुळे चिंतेत होते, तर काहींची पेरणी लांबणीवर पडली होती.
दरम्यान २८ जून रोजी पावसाने जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यानंतर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. घाटावरील तालुक्यात मुसळधार तर घाटाखाली तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला गती मिळाली आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांची पेरणी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे हे कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या निशाण्यावर का असतात ?
- ‘देशात मुर्खता मोठ्या प्रमाणात’ ; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर भडकली सोना मोहपात्रा
- दिनो प्रकरणात खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील; नितेश राणेंचा अप्रत्यक्ष निशाणा
- आयसीसी स्पर्धेसाठी पीसीबीने सुरु केली मोर्चेबांधणी; बीसीसीआयला धक्का देण्याच्या तयारीत
- ‘फुकटचे श्रेय घेण्याचा मंत्री महोदयांचा प्रयत्न’, पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा


