🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अमीर खान याची सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चा होत आहे. अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. सध्या या बातमीमुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
AAMIR KHAN – KIRAN SEPARATE… JOINT STATEMENT… pic.twitter.com/YlixZbvtIA
— taran adarsh (@taran_adarsh) July 3, 2021
आमिर आणि किरणने स्टेटमेंटमध्ये म्हंटले की,’ १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करणार आहोत,’ असे यात त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. त्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता. किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं.
अमीर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अमीर खानचा २०१८ मध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा आला होता परंतु या सिनेमाला जास्त प्रशंसा मिळाली नव्हती.
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

