🕒 1 min read
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने काल अभिनेता दिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितलं आहे. यावर आता भाजप आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत.
नितेश राणे यांनी शनिवारी ट्विट करत यासंदर्भात बोलले आहे. दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. दिनो मोरियाला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे फारसे यश मिळाले नाहीत.
Dino is the Waze of BMC !!
If one digs more … lot of penguins will come out running..
We have the proofs!!— Nitesh Rane (@NiteshNRane) July 3, 2021
अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने काल अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचे ईडीने सांगितलं आहे.
या संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचं ईडीने सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे. यात अभिनेता संजय खानची ३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात येत आहे. डीजे अकीलच्या १.९८ कोटी तर इरफान सिद्दीकी यांच्या २.४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लेकं वामिकासह इंग्लंडमध्ये फिरताना दिसली अनुष्का ; यावेळीही चाहते निराश
- के एल राहुल कर्णधार विराटचा फेवरेट पण राहुलचा फेवरेट कर्णधार माहीच
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपल्याच कर्णधाराला ठेवलं टीमबाहेर
- ‘गब्बर’च्या टीमचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण ; सरावाला सुरवात
- ‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

