Share

‘अमित शाह यांच्या मुलाची संपत्ती देखील भरमसाठ वाढलीये’; ईडी कारवाईवरून नाना पटोलेंचा टोला

Published On: 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राज्यात मोठ्या कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह बांधकाम व्यावसायिक, मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या विरोधातील चौकशांना ईडीने गती दिली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांना ईडीने मोठा धक्का दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने कारवाई करत अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही  कारवाई अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाया फक्त भाजप विरोधी नेत्यांच्या मागे लागल्या असून भाजपचे नेते धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा सवाल निर्माण होत आहे.

ईडीच्या कारवाईवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘विरोधी पक्षांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठीच ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा करत आहे. त्यांच्या दहपशाहीला आम्ही भीत नाही. अमित शाह यांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढली आहे त्याची चौकशी ईडी का करत नाही. जो भाजपात प्रवेश करतो त्याचे सर्व पाप धुतले जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे,’ असं पटोले म्हणाले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!