🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मार्च महिन्यापासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. असं असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाट आणि डेल्टा प्लस व्हेरियंट प्रसार हे अधिक धोकादायक असल्याने राज्य सरकारने राज्यभरात पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत.
तर, पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु होती. दिवसाला ७-८ हजारांच्या घरात गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी कोरोनामुक्तांपेक्षा नव्या कोरोना बाधितांची संख्या ही अधिक आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट आधी ४.६ टक्के इतका होता आता हा रेट ५.३ एवढा झाला आहे.
दरम्यान, आज (दि. ०२ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल २६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७९ हजार ०७२ इतकी झाली आहे. शहरातील २२० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६७ हजार ७२५ झाली आहे.
आजच्या रुग्णवाढीमुळे सक्रिय रुग्णसंख्या ही २७०० वर गेलीये. पुणे शहरात सध्या २,७४८ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २८५ रुग्ण गंभीर तर ४२१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- स्वच्छता प्रिमियर लीगचे थेट लाईव्ह प्रक्षेपण खास औरंगाबादकरांसाठी! ८० कर्मचाऱ्यांचा सत्कार
- औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात यावे, आ.अंबादास दानवेंची मागणी!
- जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही – गुणरत्न सदावर्ते
- ‘भाजप राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करतं; आम्ही त्याला भीक घालत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

