Share

औरंगाबादेत ९३ टक्के शाळांनी दहावीचे निकाल लावले, उर्वरित लवकरच लागणार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा रद्द झाली आहे. मूल्यमापन करून त्याआधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. औरंगाबाद विभागीय मंडळाअतर्गंत येणार्‍या शाळांपैकी ९३ टक्के शाळांनी दहावी विद्यार्थ्यांचे निकाल पाठवले असून उर्वरीत शाळांनी लवकर निकाल पाठवावेत, असे आवाहन औरंगाबाद विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी वर्गाची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांना मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंदा दहावीचे १ लाख ८४ हजार हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. आता या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शासन निर्देशांनुसार शाळांकडून केले जात आहे. आजवर ९३ टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करून औरंगाबाद विभागीय मंडळाकडे पाठवले आहे. उर्वरीत ७ टक्के शाळांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल पाठवावेत, असे आवाहन पुन्ने यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!