बुलडाणा: खामगाव तालुक्यातील चीतोडा अंबिकापुर येथील वैयक्तिक वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी या दोन्ही कुटुंबाला आझाद हिंद संघटनेचे संस्थापक ऍड. सतीषचंद्र रोठे यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली आणि त्या दोन्ही कुटुंबातील निर्दोष लोकांवरील गुन्हे कमी करण्याची मागणी केली.
चितोडा अंबिकापुर येथे दि. १९ जून रोजी विभिन्न समाजातील दोन कुटुंबात वैयक्तिक कारणावरून वाद झाला, यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र या वादाला काही राजकीय लोकप्रतिनिधी जातीय वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे जनतेने अशा वक्तव्यांना बळी पडू नये आणि शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आले आहे.
तालुक्यात झालेल्या या दोन कुटुंबातील वादामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली होती. मात्र आता ही परिस्थिती काही प्रमाणात निवळली असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आता या प्रकरणातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर प्रकरणातील निर्दोष लोकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवऱ्याच्या उसण्या पैशांची विवाहितेकडे मागणी, न दिल्याने बेदम मारहाण
- पुन्हा नाका बंदी सुरु! तरीही चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या
- ‘ईडीला कोणीतरी सांगतंय, त्याचा काटा काढायचाय आणि मग…’; शेट्टींच्या विधानाने खळबळ !
- कोरोना सुरु झाल्यापासून औरंगाबादेत झाल्या ८ लाख चाचण्या!
- शिल्लेगाव पोलिसांनी आवळल्या कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

