🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचे संकट थैमान माजवत आहे. कोरोना विरोधातील या लढ्यामध्ये सध्या लसीकरण हेच एक प्रभावी शस्त्र उपलब्ध आहे. या लसीकरण प्रक्रियेवरुन सध्या अनेक मतभेद आणि वाद सुरू असलेले दिसून येत आहेत.
‘भारत सरकारने जागतिक योगदिनापासून ७५ टक्के लसी राज्यांना मोफत देण्यास सुरुवात कली. त्यावेळेपासून लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. जून महिन्यात राज्यांना केंद्राकडून ११ कोटी ५० लाख लसी दिल्या गेल्या. या महिन्यात ही संख्या वाढवून किमान १२ कोटी लसी देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जर विरोधी नेत्यांना यातील वस्तुस्थिती माहिती असेल व तरीही ते बेजबाबदार टीका करत असतील तर ते दुर्दैवी आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी कालच सांगितले होते. तरीही आज परत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
‘जुलै आला, लस आली नाही’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला. यामुळे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन चांगलेच संतापले आहेत. राहुल गांधी यांना लसीवर क्षुद्र राजकारण करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
Just yesterday, I put out facts on vaccine availability for the month of July.
What is @RahulGandhi Ji’s problem ?Does he not read ?
Does he not understand ?There is no vaccine for the virus of arrogance and ignorance !!@INCIndia must think of a leadership overhaul ! https://t.co/jFX60jM15w
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) July 2, 2021
आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘मी कालच जुलै महिन्यात लस उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींची समस्या काय आहे? ते वाचत नाहीत का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरसची कोणतीही लस नाही. काँग्रेसने आपल्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या हाताळणीवर लक्ष देण्याची गरज आहे.’
क्षुद्र राजकारण करणे योग्य नाही
दुसरीकडे, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘लसीचे १२ कोटी डोस जुलै महिन्यात उपलब्ध होतील जे खासगी रुग्णालयांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळे आहेत. राज्यांना १५ दिवस अगोदर पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधींना समजले पाहिजे की कोरोनाच्या लढाईत क्षुद्र राजकारण करणे योग्य नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं’, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला
- ‘फडणवीस-शाह भेटीचा सरकार पाडण्याशी संबंध नाही’, दानवेंचे स्पष्टीकरण
- महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’? शाह-फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय?
- ‘पदोन्नती आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारला निर्णय घेणे अशक्य’
- जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाईनंतर अजित पवारांचे प्रथमच भाष्य, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

