Share

‘अमित शाहांना पत्र लिहितोय, आता एक-एक नाव समोर येईल’; जरंडेश्वर जप्तीवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने कारवाई करत अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला आहे. ईडीची ही कारवाई अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खाजगीरित्या विकत घेतला गेला.

या कारवाई आधीच भाजपने अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी यासाठी थेट गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याच्या जप्तीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना ही सुरुवात असल्याचं म्हटलं आहे.

‘जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. मी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय, लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे,’ अशी प्रतिक्रिया देतानाच मी कोणाला धमकी नाहीये असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निकटवर्तीयांसह इतर साखर कारखान्यांच्या गैरव्यवहाराबाबत अनेक नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शालिनीताई पाटलांचा अजित पवारांवर गंभीर आरोप –

जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनी ताई पाटील यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय. ‘देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,’ अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!