🕒 1 min read
मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर आता आणखी एक नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारी पदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली आहे. ;चित्रा वाघ या उत्तम जबाबदारी सांभाळतील आणि पक्षाला याचा फायदा होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
युवती आणि महिला या विषयातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांची भाजपा महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चित्राताई, मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीकरिता हार्दीक शुभेच्छा! pic.twitter.com/WEKbvd06TA
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 30, 2021
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजप-सेना युतीमध्ये जाणाऱ्यांची रांग लागली होती. यामध्ये चित्रा वाघ या देखील होत्या. चित्रा वाघ यांचा राजीनामा आणि भाजप पक्षप्रवेश यामागे अनेक कारणे सांगितली जात असली तरीही राष्ट्रवादीसाठी वाघ यांनी पक्ष सोडणे हा मोठा धक्का मानला गेला होता.
त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची महिला आघाडी जेव्हा सांभाळत होत्या त्यावेळी त्यांचे संघटन कौशल्य सर्वांनी पाहिले आहे.कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या गुणांचा त्यांनी त्यावेळी चांगलाच वापर केला होता.अनेक महिलांना त्यांनी त्यावेळी राजकारणात आणले. कित्येक महिलांची राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांना अनेक ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली.
दरम्यान,भूतकाळ विसरून नव्या उमेदीने वाघ या भाजपमध्ये सक्रीय झाल्या असून पक्षासाठी योगदान देण्याचा त्यांच्यापरीने त्या प्रयत्न करत आहेत. मागील काही काळात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात चांगलेच आक्रमक रूप धारण केलंय. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. संजय राठोड प्रकरण, महेबूब शेख प्रकरण आदी प्रकरणात त्यांनी बुलंद केलेला आवाज महिला वर्गाला विशेष भावला.
टीव्हीवरील वेगवेगळ्या चर्चांमध्ये त्या कायम महिलांच्या तसेच तरुणींच्या विविध समस्या आक्रमकपणे मांडताना दिसून येतात. अल्पावधीतच त्यांनी आपली भाजपमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक तरुणी त्यांच्याकडे आपल्या विविध समस्या घेवून जात आहेत. राज्यातील युवतींना न्याय मिळवून देण्याची तसेच महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची अत्यंत महत्वाची जबादारी त्यांच्यामध्ये असणाऱ्या नेतृत्व गुणांचा विचार करूनच देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाने दिलेल्या या ताकतीचा त्या नक्की उपयोग करतील असा विश्वास पक्षाला वाटत आहे. वाघ यांच्याकडे असणाऱ्या संघटन कौशल्याचा फायदा पक्षाला देखील होणार असल्यामुळेच त्यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !
- व्हीप म्हणजे काय?, तो का काढतात?; जाणून घ्या सविस्तर
- विधानसभा अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?
- उद्धवजी… जबाबदारी एकमेकांवर ढकलून लसीकरण मोहीम यशस्वी होईल का ?
- समता फाऊंडेशनचे उल्लेखनीय कार्य! ३० हजार जणांचे मोफत लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
