Share

आता चित्रा वाघ यांच्या खांद्यावर चंद्रकांतदादांनी सोपवली ‘विशेष’ जबाबदारी !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात चांगलंच आक्रमक रूप धारण केलंय. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी सरकारची चांगलीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. तसेच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यातील अधिकाऱ्याची महिलेशी असलेलं गैरवर्तन समोर आणून महिलांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यासोबतच, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासह टीकास्त्र सोडण्याच्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपने आता ‘विशेष’ जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची विशेष जबाबदारी चित्रा वाघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चित्रा वाघ यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. अवघ्या दोन वर्षांमध्ये त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नेमणूक केली असून अभिनंदन देखील केलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचे चित्रा वाघ यांना पत्र –

सस्नेह नमस्कार… भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात… गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात.. युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे… आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे… आपल्या आगामी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा… आपला चंद्रकांत पाटील

पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन…

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस तसेच सुधीर मुनगंटीवार यांचे मनस्वी आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!