Share

मित्राच्या वाढदिवसाला डीजेच्या तालावर डान्स; ९ जणांवर गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

बीड : मित्राच्या वाढदिवसाला डीजे (डॉल्बी) लावून मोठ्या आवाजात गाणे वाजवणे चांगलेच महागात पडले आहे. डीजेच्या तालावर नाचत असताना पोलिसांनी छापा मारला. मात्र पोलिसांना पाहून आरोपी पळून गेल्याचा प्रकार केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे घडला. याप्रकरणी केज पोलिसात माजी सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बोबडेवाडी येथे अमर बोबडे याच्या वाढदिवसानिमित्त २७ जून रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर एका टेम्पोत डीजे डॉल्बी सिस्टिम लावून मोठ्या आवाजात गाणे सुरू होते. यावेळी २० ते २५ जणांचा ग्रुप थिरकत होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने रात्री आठच्या सुमारास अचानक छापा मारला.

या ठिकाणी टेम्पोमध्ये ( एमएच २३ – २४८७ ) डीजे वाजवून १० ते १५ मुले नाचत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस आल्याचे समजताच माजी सरपंच संतोष क्षीरसागर, अमर भारत बोबडे, निरंजन बोबडे, अक्षय अर्जुन कोठुळे, ओम बाबासाहेब करपे, ज्ञानेश्वर शिवाजी बोबडे, गणेश महादेव आदमाने, तेजेस जनार्दन बोबडे, अण्णा बोबडे ( सर्व रा. बोबडेवाडी ) हे पोलिसांना पाहून पळून गेले. यावेळी डीजे मालक महेश अनिलराव जाधव ( रा. प्रशांतनगर, केज) हा तिथेच उपस्थित होता. त्याच्यासह टेम्पो, डीजे सिस्टिम ताब्यात घेण्यात आला. तर एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!