Share

अखेर तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना प्रत्यक्षात मदत मिळणार; राज्य सरकारच्या निधीस मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने महिन्याभरापूर्वी घेतला होता. कोरोनामुळे आर्थिक स्थिती आधीच हलाखीची झाली असताना नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणवासियांचं मोठं नुकसान झालं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा धावता दौरा केला, यानंतर राजकीय टीका-टिप्पणी झाल्या मात्र प्रत्यक्ष मदतीची वादळग्रस्तांना वाटच पाहावी लागली.

आता प्रत्यक्ष मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय आज तब्बल १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून निधी वितरणाच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. आता ही मदत नुकसानग्रस्तांना कधी मिळणार हे महत्वाचं आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार ?

‘तौक्ते वादळग्रस्तांना १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ४ दिवसीय कोकण दौरा केला होता. नागरिकांसोबत संवाद साधून माहित घेतली होती. नुकसानीची पाहणी करत असताना वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून वादळग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती,’ अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘या अनुषंगाने महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. नुकसानीसाठी मदत व इतर अनुद्येय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!