🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र, अनेक नागरिक अद्यापही लसीकरण करून घेण्यास विविध कारणे देत आहेत.
त्यामुळे एकीकडे उत्साही नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत केंद्रावर जातात मात्र त्यांना लस मिळत नाही. तर, ज्या भागात लस असते तिथे नागरिक लसीकरणास जात नाहीत, अशी विषम स्थिती समोर येत आहे. दरम्यान, राज्यासह देशातील दुसऱ्या लाटेचा धोका ओसरला असून कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट आणि संभाव्य तिसरी लाट यांचा धोका कायम आहे. मुंबई पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या तीव्रता पाहायला मिळाल्या आहेत.
आता पुढील धोका टाळण्यासाठी अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर दिला जात असून टाळाटाळ करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नामी शक्कल लढवली आहे. कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन स्थगित केलं जाईल, असं परिपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी काढलं आहे. तर, लस घेण्यासाठी 20 जुलैपर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.
सर्वसामान्यांनी लस घ्यावी अशी जनजागृती प्रशासन करत असताना, महापालिकेचा कर्मचारी लस अभावी मागे राहू नये, म्हणून वेतन स्थगित करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले असून काहींनी मात्र अद्याप लसीकरण केलेलं नाही. आता त्यांना २० जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली असून कर्मचारी याला कसा प्रतिसाद देतात हे महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO
- ‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’; पवारांच्या भेटींबाबत संजय राऊतांच भाष्य
- ‘माझं वय ७२ वर्ष, आजही चौकशीला हजर राहू शकत नाही’; अनिल देशमुखांच ईडीला पत्र
- पुण्याच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला महापौरांनाच न बोलावणे हे अनाकलनीय आहे
- ‘अनिल देशमुखांना आता कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
