Share

‘राहुल गांधी खोटे सांगून अफवा पसरवत आहेत’, शिवराज सिंग चौहानांचा संताप

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत असून लसीकरणाबाबत ते करत असलेल्या वक्तव्यं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याची टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. लसीकरणावरून राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला शिवराज सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘पहले हर देशवासी तर व्हॅक्सिन पहुंचा दो, फिर चाहे मन की बात भी सुना दो’, असे ट्विट करत राहुल गांधींनी देशातील संथ गतीनं सुरु असलेल्या लसीकरणावर टीका केली होती. मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले होते.

यावर शिवराज सिंग चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून जोरदार टीका करताना दिसत आहेत.

मोदींनी घेतली आढावा बैठक
देशात सध्या करोना पाठोपाठ डेल्टा प्लस या नव्या आजारानेही डोकं वर काढलं आहे. तर, अनेक ठिकाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात लस पुरवठा होताना दिसत नाही. देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी देखील लसीकरण मोहीमेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन, लसीकरणास वेग देण्याच्या सूचना केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!