🕒 1 min read
लोणावळा : ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
या शिबिरात भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या शिबिराला हजेरील लावली. यात काही राजकीय ठराव मांडण्यात आले. दरम्यान, इम्पिरिअल डाटा मिळवण्यासाठी राज्य सरकार उद्याच सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी या शिबिरात दिली आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी जाहीरपणे मनातील सल बोलून दाखवली आहे. आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला असून हा काँग्रेससह महाविकास आघाडीला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे. ‘महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो, तरी 25 लाखांची सभा होईल. ‘झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये’. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली,’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढतायत’; शिवसेना आमदाराचा पलटवार
- ‘राज्य सरकार निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा’
- ‘ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत’; पंकजा मुंडे कडाडल्या
- मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता
- ‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले पण मी केंद्रात प्रयत्न करणार’- आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
