Share

‘ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले पण मी केंद्रात प्रयत्न करणार’- आठवले

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी मी केंद्र सरकार मध्ये प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली ओबीसी आरक्षणाबाबत रिपब्लिकन पक्षाची भूमिका कळविली आहे.

ओबीसी आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा सदैव पाठिंबा राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. महाविकास आघाडी सरकार ने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची योग्य बाजु मांडली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्यात आले. त्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.असे  रामदास आठवले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेऊन ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा विषय आपण मांडला होता. या पुढे ही ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकार मध्ये प्रयत्नशील राहणार असल्याचे  रामदास आठवले यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!