Share

‘ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत’; पंकजा मुंडे कडाडल्या

Published On: 

🕒 1 min read

लोणावळा : ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या शिबिरात भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या शिबिराला हजेरील लावली. यात काही राजकीय ठराव मांडण्यात आले. दरम्यान, इम्पिरिअल डाटा मिळवण्यासाठी राज्य सरकार उद्याच सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी या शिबिरात दिली आहे.

या शिबिरात पंकजा मुंडे यांनी भाषण करताना ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पुढील निवडणूक होऊ द्यायच्या नाहीत अशी गर्जना करतानाच मराठा समाज आणि ओबीसी समाजात वितुष्ट येईल असं काम करू नका अशी हात जोडून विनंती करत असल्याचं देखील म्हटलं आहे.

‘OBC राजकीय आरक्षण संदर्भात लोणावळ्यात चिंतनमंथन शिबिर पार पडले. हे शिबीर निर्णय आणि निश्चयाचे आहे. 3/4 महिन्याच्या आत impirical data तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. OBC च्या आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ द्यायच्या नाहीत. आधी मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरी मध्ये आरक्षण रद्द तर आता ओबीसी राजकीय आरक्षण रद्द किती घोर अन्याय आहे दोन्ही वर!!माध्यमाची आणि लोक प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची वितुष्ट येईल असे होऊ देऊ नका हात जोडून विनंती.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसी शिबिरात ठरले ‘हे’ 10 महत्त्वाचे ठराव :

  • imperial data केंद्र सरकारकडे तयार आहे तो त्यांनी राज्य सरकारला द्यावा
  • सर्वपक्षीय नेत्यांनी हे आरक्षण पुर्नस्थापित करावे
  • हे आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका घेऊ नयेत
  • राज्य सरकारने तातडीने रिट याचिका दाखल करून केंद्र सरकारकडून imperial data मिळवावा
  • मराठा आरक्षणास विरोध नाही, obc मधून आरक्षण देऊ नये
  • केंद्र, राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी आणि पदोन्नती आरक्षण रद्द करु नये
  • OBC संस्थांना भरघोस निधी मिळावा
  • संत गाडगेबाबा यांच्या नावे आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे
  • विधानसभा आणि लोकसभेसाठी 27% आरक्षण द्यावे
  • कुंभार समाजातील संस्थेसाठी निधी द्यावा

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!