Share

मेनका गांधींबद्दल भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, वाद निर्माण होण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय विष्णोई यांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विष्णोई यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना ‘घटिया महिला’ असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी मेनका गांधींची एक ऑडिओ टेप व्हायरल झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे.

‘खासदार श्रीमती मेनका गांधी यांनी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी ज्या शब्दांत बोलल्या त्यावरून पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दर्जाचे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचं सिद्ध होतं. त्या माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते’ असं अजय विष्णोई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून नाव वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
व्हायरल झालेल्या ऑडिओ टेपमध्ये मेनका गांधी जबलपूरच्या नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर विकास शर्मा यांच्याशी संभाषण करीत आहेत. या दरम्यान त्यांनी संपूर्ण पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घटिया म्हटले होते. हा ऑडिओ २१ जूनचा आहे. डॉ. विकास शर्मा आणि डॉ. एल.एन. गुप्ता यांनी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांचा असा आरोप आहे की मेनका गांधींनी त्यांना फोन करून धमकावले आणि श्वानाच्या उपचारासाठी ७०,००० रुपये देण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!