🕒 1 min read
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्या विकास योजनेची समीक्षा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अयोध्येशी संबंधित विकासाच्या अनेक योजनांचे सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले.
राम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या अयोध्या शहराच्या विकास आराखड्यातून भारताची समृद्ध परंपरा व उत्कृष्ट विकासात्मक स्थित्यंतरांचे दर्शन घडले पाहिजे,अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे
अयोध्या हे ठिकाण अध्यात्मिक केंद्र आहे. तेथील मानवी जीवनाचा जो बाज आहे त्याचे प्रतिबिंब आगामी काळातील शहर विकास योजनेत दिसले पाहिजे. तेच पर्यटक व भक्तगणांसाठी आकर्षण ठरेल, असे सांगून ते म्हणाले,की आगामी पिढ्यातील लोकांना आयुष्यात एकदा तरी अयोध्येत आले पाहिजे असे वाटले पाहिजे. भगवान राम यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची ताकद होती. अयोध्येतील विकास कामे ही सार्वजनिक सहभागातून झाली पाहिजेत. तरुणांच्या बुद्धिमत्तेचा वापर विकासात केला गेला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘यामुळे’ मला भुजबळांच्या बुद्धीची कीव येते; हरिभाऊ बागडेंची टीका
- सत्तांतरानंतरच्या हालचाली, जळगावात भाजपचे बंडखोर नगरसेवक गटनेता बदलण्याच्या तयारीत
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय राठोड यांचा ‘घर-अंगण चंदन’ उपक्रम
- ‘संजय राऊत खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना’; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
