🕒 1 min read
जळगाव : जळगाव महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप बंडखोरांची संख्या तीसवर पोहोचल्यानंतर आता आपल्या मर्जीतील गटनेता व्हावा या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. लवकरच बंडखोरांची बैठक होऊन त्यात नवीन गटनेता निवडला जाणार आहे. पक्षाने हकालपट्टी न केल्यामुळे तसेच अपात्रतेसंदर्भात कोणतीही नोटीस न मिळाल्याने अजुनही भाजपचा शिक्का कायम असल्याने त्याचा फायदा उचलण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
महानगरपालिकेत भाजपला खिंडार पाडून शिवसेनेने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. भाजपचे ३० नगरसेवक गळाला लावून शिवसेना सत्तेत दाखल झाली आहे. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. बंडखोरी करून शिवसेनेसोबत गेलेल्या ३० नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २७ नगरसेविकांविरूद्ध विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल आहे.
यात लवकरच बंडखोर नगरसेवकांना विभागीय आयुक्तांकडून नोटीस प्राप्त होईल.पण त्यांच्यावर सध्या तरी बंडखोरीचा शिक्का असून अद्याप त्यांची पक्षाने हकालपट्टी केलेली नाही. त्यामुळे आम्ही अजूनही भाजपचे नगरसेवक असून तीस जणांच्या स्वतंत्र गटाल अपेक्षित असलेला नेता निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे बंडखोर नगरसेवक सांगताहेत.
बंडखोर ३० नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ३८ सदस्यांची गरज आहे. गट स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी ८ सदस्यांची गरज आहे. परंतु शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजप सदस्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र गट स्थापन करण्यापेक्षा आहे त्याच पक्षाच्या माध्यमातून गटनेता पद ताब्यात घेण्याची खेळी खेळण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
