🕒 1 min read
मुंबई : जुलैमध्ये टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम मुंबईमध्ये पोहचली आहे. श्रीलंकेला जाणारी टीम मुंबईत आपला विलगीकरण कालावधी पूर्ण करत आहे. त्यासोबतच श्रीलंका दौऱ्याची जोरदार तयारी देखील करत आहेत. खेळाडूंना एकत्र येऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू जिम सेशनमध्ये घाम गाळताना दिसून येत आहेत.
https://www.instagram.com/reel/CQgdkjphFc4/?utm_source=ig_web_copy_link
श्रीलंका विरुद्ध भारत सामन्यांसाठी भारताने नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. शिखर धवनला कर्णधार तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. दरम्यान, दीपक चाहर देखील दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी दीपक चाहरने इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात व्हिडिओमध्ये तो हॉटेलमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. फलंदाजी करताना त्याने बेसबॉलची बॅट वापरली आहे. या व्हिडिओमध्ये नवदीप सैनी त्याला गोलंदाजी करत आहे. तर चेतन सकारिया क्षेत्ररक्षण करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत चाहरने या व्हिडिओला कॅप्शन दिले की, “हे पाहून मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. अजून कोणाकोणाला असे वाटले.” यावेळी दिपक आपल्या शाळेतल्या आठवणींत रमला असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
