🕒 1 min read
इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. सह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला.
परंतु,, डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे. या स्पर्धेचा विजेता किमान तीन सामन्यांच्या निकालाने ठरला पाहिजे, असे विधान काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रशिक्षकांच्या मताशी सहमत आहे. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, केवळ दोन दिवसांच्या खेळावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने असे मत व्यक्त केले होते.
Where in the schedule would it fit in ?? Are the IPL going to reduce the year of the final tournament by 2 weeks so it could fit in ? Doubt it ..: Finals are one off games where teams/individuals know they have to deliver … that’s what makes them so great ???? https://t.co/MhqHkp5lvH
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 24, 2021
मात्र, ही गोष्ट इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला फारशी आवडली नाही. त्याने ट्विटरवरून कोहलीला सुनावले. क्रिकेटच्या वेळापत्रकात तीन सामन्यांची अंतिम फेरी खेळवण्यासाठी वेळ कुठे आहे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ज्यावर्षी असेल, त्यावर्षी आयपीएल स्पर्धा दोन आठवड्यांनी कमी करणार का? मला नाही वाटत. फायनल हा एकच सामना असतो. एकच सामना असल्याने आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार हे संघ/खेळाडूंना ठाऊक असते. त्यामुळे अंतिम सामन्याला इतके महत्त्व असते, असे वॉन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
