🕒 1 min read
मुंबई : गेल्या दोन वर्षापासुन सुरु असलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा न्युझीलंडने ८ गडी राखुन पराभव केला आहे. भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने २ गडी गमावत सहज पार केले. या पराभवानंतर भारतीय संघावर सर्वस्तरातुन टिका होत आहे.
यात सर्वात जास्त मागणी होत आहे ती विराट कोहलीची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्याची. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटु मोहिंदर अमरनाथ यांनी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तसेच कौतुक करताना त्यांनी विराट कोहलीची तुलना ही ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिवियन रिचर्ड्स् यांच्याशी केली आहे. १९८३ विश्वचषक संघाचे सदस्य असलेले अमरनाथ म्हणाले की, ‘विराट हा उच्च दर्जाचा खेळाडू आहे आणि एक उत्कृष्ट कर्णधारही आहे. यामुळे त्याच्याकडुन असलेल्या अपेक्षाही खुप असतात. त्यामुळे या अपेक्षा पुर्ण न झाल्यांने त्याच्यावर झालेली टीका ही त्याच्याप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतिक आहे.’
यावेळी पुढे बोलताना अमरनाथ म्हणाले की, ‘त्याच्यासारखा खेळाडू अनेक वर्षात एखादा घडत असतो. त्यामध्ये मला ‘ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिवियन रिचर्ड्स् या दिग्गज खेळाडूंची छबी दिसते.’ असे म्हणाले. तसेच कर्णधार म्हणून विराट कोहलीच रहावा असे त्यांनी सुचवले. विराटने फलंदाजीत दैदीप्यमान कामगिरी करत जगातील सर्वोत्तम फलंदाजात स्थान पटकावले आहे. मात्र यादरम्यान तो एकही आयसीसी स्पर्धा आणि आयपीएल चषक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही.
महत्वाच्या बातम्या
- आयपीएलवरुन ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील वाद शिगेला, शेन वॉर्नने केले ‘हे’ वक्तव्य
- टी-२० विश्वचषक स्पर्धेबद्दल जय शाह यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले….
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- औरंगाबाद पालिकेचे पाऊल आधुनिकतेकडे, एकाच क्लिकवर औरंगाबादकरांना मिळणार सर्व सुविधा!
- मनपा आयुक्त शिवसेनेचे कि औरंगाबादचे?, सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळा अनावरणात काँग्रेसला डावलले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
