🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागल्याने भारतात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यादरम्यान ही स्पर्धा भारताबाहेर गेली असल्याची चर्चा सुरु होती.
या चर्चेवर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही युएईमध्ये हलवण्यात येऊ शकते. मात्र यादरम्यान आम्ही भारतातील कोरोना परिस्थीतीवरही बारीक लक्ष ठेवुन आहोत. पण या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. निर्धारित कार्यक्रमानुसार आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात आयोजीत करण्यात आली आहे.
मात्र भारतातील जर कोरोना परिस्थीती सुधारली नाही तर ही स्पर्धा युएईमध्ये हलविण्यात येऊ शकते. यादरम्यान बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित सामने हे युएईमध्येच आयोजीत करण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिण्यात आयोजीत करण्यात येणार आहे. आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना हा १५ ऑक्टोबर रोजी आयोजीत करण्यात आला आहे. तर टी-२० विश्वचषक स्पर्धा ही १७ ऑक्टोबरपासुन सुरु करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक आजाराचे आपण औषध नाही पण प्रयत्न करून प्रश्न सोडवा’ ; पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी मोदी-फडणवीसच ; कॉंग्रेसचा घणाघात
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘खडसे, मुंडे, तावडेंची… याद करो कुर्बानी’, काँग्रेसच्या बॅनरने ‘धुरळा’
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
