Share

कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी वाढवतेय आपली ताकत

Published On: 

🕒 1 min read

पुणे – शिवसेना पक्षातून राजकीय प्रवास सुरू करणारे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी आपली नवी राजकीय इनिग सुरु केली.

शिवसेना, काँग्रेस, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा मोहिते यांचा पक्षांतराचा प्रवास आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते भाजपचे माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. ते रामटेक लोकसभा मतदासंघामधून शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा निवडून सुद्धा गेले होते. पुढे अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये सुबोध मोहिते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री राहिले होते.

माेहिते यांनी २००७ मध्ये शिवसेनेला रामराम करून काँग्रेसशी घरोबा केला. मधल्या काळात त्यांनी शिवसंग्राममध्ये देखील प्रवेश केला होता.  यानंतर सुबोध मोहिते यांनी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता, परंतु माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी देखील त्यांचे खटके उडाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध तोडले. काल त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत आपली नवी राजकीय इनिग सुरु केली आहे.

विदर्भातील राजकारणात सुबोध मोहिते यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळेच विदर्भात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठीच मोहितेंना प्रवेश देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.विदर्भाला कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानले जाते आता याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने चंचूप्रवेश करायला सुरुवात केली आहे. विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हळूहळू इनकमिंग सुरू झाले आहे. प्रशांत पवार, आभा पांडे, रमण ठवकर, रविनिश पांडेय यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला. सुबोध मोहिते यांच्या प्रवेशामुळे पक्षाला आणखी एक नेता मिळाल्याने शहर व ग्रामीण भागात बळ मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!