Share

मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलक ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने तसेच मोर्चे देखील काढण्यात आले. शहरात आज दि. २२ जून रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र ते काही यशस्वी झाले नाहीये.

शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्नावस्थेत आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मंगेश साबळे यांनी दिली होती. तसेच २२ जुने या तारखेपासून पाच दिवसांची मुदत शासनाला देत आहोत, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अंगावरील सर्व कपडे काढून नागडे आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

मंगळवारी दि. २२ जून रोजी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मंगेश साबळे व इतर कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी जमले असता त्यांना पोलिसांनी हे आंदोलन करू दिले नाही. अर्धनग्न होऊन आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याने पोलिसांना हे आंदोलन बळाचा वापर करून थांबवावे लागले आहे. राज्यात सर्वत्र आंदोलने सुरु आहेत, मात्र यातून कुठला मार्ग अद्याप निघाला नाहीये. आरक्षण प्रश्नी पुढे काय होणार आणि यामुळे राज्यातील राजकारण कसे रंगणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!