🕒 1 min read
तेलंगणा : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार अधिक होत असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वत्र लसीकरणावर भर देण्यात आला. यासाठी अनेक भागातील नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जात आहे. मात्र यावेळी लसीकरणाबाबत एक अनोखी घटना समोर आली आहे.
तेलंगणामधील करमीनगर येथे शुक्रवारी घडल्याचे समोर आले आहे. करीमनगरमधील रामदुगु मंडलातील वेंकटरोपल्ली गावाचे सरपंच जुवाजी शेखर हे शुक्रवार स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. यावेळी चाचणी दरम्यान स्वॅब स्टिक नाकातच तुटली आणि ती त्यांच्या घशात जाऊन अडकली. यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर डॉक्टर व परिचारिकांनी त्यांच्या नाकातील तुटलेली स्टिक काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही.
गावात रॅपिड अॅन्टिजेन टेस्टसाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना गावकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनायचं होतं म्हणून त्यांनी सर्वात आधी जाऊन स्वतःची तपासणी करून घेण्याचे ठरवले. मात्र त्यानंतर धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या नाकात जेव्हा स्वॅब स्टिक टाकण्यात आली, तेव्हा ती नाकातच तुटली आणि त्यांना प्रचंड वेदना सुरू झाल्या.
यानंतर सरपंचांची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले व तिथं एंडोस्कोपी करून स्वॅब स्टिक काढली गेली. यावर डॉक्टर म्हणाले की, स्वॅब स्टिक नाकातून घसरून घशात जाऊन अडकली होती. एंडोस्कोपीकरून ती काढण्यात आली आहे. या प्रकारामुळे सरपंच जुवाजी शेखर यांनी गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप फ्रॉड पार्टी आहे, पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्ते मागत आहेत जनतेची माफी !
- ‘कोणतीही वाटाघाटी नाही, ५ वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार’ – संजय राऊत
- वाघाच्या मिशीला हात घालण्याची हिम्मत नाही; संजय राऊतांचा पुन्हा चंद्रकांतदादांना टोला
- धक्कादायक! युरो २०२० स्पर्धेदरम्यान अचानक कोसळला ‘ख्रिस्टीयन एरिक्सन’
- PNB ग्राहकांना ‘या’ नंबर द्वारे मिळू शकते अकाउंट बॅलन्सची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
