Share

…तरच पुण्यातील निर्बंध होणार शिथिल !

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राज्य सरकारने कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. या पाचही स्तरांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून हे निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

मात्र, कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील असेही त्यांनी सांगितले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली असून ही समाधानाची बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेवूनच हा निर्णय घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लसीकरणाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्हयात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. लस उपलब्धतेबाबत सातत्याने आपला पाठपुरावा सुरू असून दिव्यांग बांधवाना लसीकरण सुरू करण्यात आले आहे तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचेही लसीकरणाबाबत आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्हयात दररोज एक लाखापर्यंत लसीकरण होईल, एवढी क्षमता निर्माण करण्यात आली आहे, लस उपलब्धतेप्रमाणे यामध्ये गती घेता येईल. ३१ ऑगस्टपर्यंत मोठया प्रमाणात लसीकरणाचे काम होईल, असे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी, तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचा तुटवडा तसेच उपलब्धतेबाबतचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेत कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!