Share

शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही, पण कॉंग्रेस स्वबळावरच लढणार – पटोले

Published On: 

🕒 1 min read

अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चालवताना होणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांसमोर नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मोदी-ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी आमचं नातं संपलं नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

या बैठकीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य करताना हे सरकार चालेल की नाही असं अनेक जण म्हणतात. परंतु महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष चालेल आणि आगामी २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढतील आणि जिंकतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांच्या ‘ऐकी’च्या नाऱ्यालाच सुरुंग लावला आहे. शरद पवार काय म्हणालेत हे आपल्याला ठावूक नाही. मात्र, आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका आपणच जाहीर करणार असल्याचं पटोले यांनी निक्षून सांगितलं. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार असल्याचं ते म्हणालेत. यासोबतच 2024 मध्ये काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं भाकीत केलं आहे. ते अकोल्यात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!