Share

उदयनराजेंच्या वाढदिवसला जायचं की नाही राष्ट्रवादीसमोर पेच; शरद पवारांनी घेतली गुप्त बैठक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या शाही वाढदिवसा निमित्त साताऱ्यामध्ये जोरदार तयारी केली आहे. मात्र, उदयनराजेंच्या वाढदिवसाला जायचं की नाही याचच पेच राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांसोबत गुप्त बैठक घेतली.

या बैठकीला विधान परिषद सभापती रामराजे नाईक, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे , मकरंद पाटील, नरेंद्र पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले छत्रपती यांच्या वाढदिवसाची आज, साताऱ्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील बडी नेते मंडळी साताऱ्यात दाखल झाली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील दिग्गज नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असताना सोहळ्याला नेमके कोण कोण हजेरी लावणार, याची उत्सुकता लागली आहे. खासदार उदयनराजे राष्ट्रवादीचेच नेते आहेत. मात्र, त्यांच्याच सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खासदार उदयनराजे गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकतर्फी निवडून आले आहेत.

तरीही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंच्या व्यासपीठावर कोण कोण नेते हजेरी लावणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!