🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात इंग्लंडकडून ओली रॉबीन्सन आणि जेम्स ब्रेसी यांनी पदार्पण केले. यात रॉबन्सनने पदार्पणातच ७ गडी बाद करत चमक दाखवली. मात्र दुर्दैवाने रॉबीन्सनचा पदार्पणाचा सामना हाच त्याचा अंतिम सामना ठरला. कारण रॉबीन्सन २०१२-१३ मध्ये वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते. पहिल्या डावात कामगीरी करताच त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले होते. हे प्रकरण इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अतिशय गंभीरतने घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मात्र जोपर्यंत ही चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत रॉबीन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत केले आहे. मात्र यादरम्यान त्याला काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पहिला कसोटी सामना अनिर्णीत झाल्यानंतर काही वेळातच त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे न्युझीलंडविरुद्ध एजबस्टनला १० जूनपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. ओली रॉबीन्सनने लॉर्ड्स कसोटीतून पदार्पण करताना पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ३ असे मिळून ७ गडी बाद केले होते. यामध्ये त्याने केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम अशा दिग्गज खेळाडूंना बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- …लोकांना हात जोडून विनंती करतो, मेहेरबानी करा; खासदार उदयनराजे भोसलेंचं आवाहन !
- मोठी बातमी : ‘कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्या ‘
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या अश्वारुढ स्मारकासमोर ३१ फुटी स्वराज्यगुढी
- ‘प्रशासन चालवताना आपण जनतेसाठी आहोत, हे लक्षात ठेवावं यासाठीच शिवस्वराज्य दिन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
