🕒 1 min read
मुंबई: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. क्रिकेटर रोहित शर्मा, रियो ऑलिम्पिकमध्ये भारतच प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर आणि हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली होती.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेली खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार, तर २०१४-१५साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले.
Thank you Government of Maharashtra for honoring me with this prestigious Award ???????? #shivchatrapati pic.twitter.com/v0Wq62USIa
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 19, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
