Share

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बारावीच्या परीक्षा होणार कि नाही होणार ? असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडलेला होता. काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली होती. ती विचारात घेऊन येत्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं होतं.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत आहेत. पालकांची आणि विद्यार्थ्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीकरणा शिवाय बारावीची परीक्षा होऊ नये, अशी अपेक्षा अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!