Share

उस्मानाबादेत घटतीये रुग्णांची संख्या

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे, मात्र अशातच आता म्युकरमायकोसिस या नवीन आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरी कडे म्युकरमायकोसिस, यात होरपळून निघतोय सामान्य माणूस. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या व त्यातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ३०० च्या टप्प्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत रविवारी मोठी घट दिसली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमीच असून २१९ जणांची नोंद बाधितांमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे ५७७ जण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ३०० च्या टप्प्याने दरराेज कोरोना रुग्ण आढळून येत होते. त्या अगोदर तर ७०० ते ८०० चा टप्पा जिल्ह्याने पाहिला होता.

जिल्ह्यात रविवारी २१९ रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. रविवारी अशा ५७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ३२०६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्यसा ५४ हजार ६५६ वर पोहोचली असून यापैकी बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५० हजार २१७ आहे. आतापर्यंत तीन लाख ९६६ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निगेटीव्ह रिपोर्ट दोन लाख ४६ हजार ३१० आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या घटत असली तरी मृत्यू कमी होण्याचे नाव घेत नाहीत. रविवारी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूचा आकडा १२३३ वर पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!