Share

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असं सांगण्यात आले आहे.

पवार-फडणवीस भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर पवारांसोबतच्या भेटीचा फोटो ट्विट करुन याची माहिती दिली आहे. फडणवीसांनी यावेळी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. पण याभेटीमागे अनेक कारणं असल्याचं बोललं जात आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सध्या पेटला आहे. सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी नुकतंच आक्रमक भूमिका घेतली. संभाजी राजे यांनी राज्यातील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर राज्य सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या असून त्यासाठी ६ जूनपर्यंतची अंतिम मूदत दिली आहे. संभाजी राजे यांनी देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील ओबीसी आरक्षणावरुन कोर्टानं दिलेल्या निर्णयावरुनही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले होते. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही 100 कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष चिघळला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!