Share

विमान अपघातात हॉलिवूड अभिनेता जो लारासह कुटुंबातील इतर सदस्यांचाही मृत्यू

Published On: 

मुंबई  : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जो लारा टारझन या टीव्ही मालिकेतून नावारुपास आला आणि यामुळे तो लोकप्रिय झाला. मात्र जो लारा याचं विमान अपघातात वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झालं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत पत्नी आणि कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचंही निधन झालं आहे.जो लारा आपल्या कुटुंबीयांसोबत एका प्रायव्हेट विमानानं प्रवास करत होते. दरम्यान विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आणि नॅशविलेमधील टेनेसी नदीत त्याचं विमान कोसळलं.

शनिवारी सकाळ त्यांच्या विमानाने फ्लोरिडाच्या पाम बीच, टेमिनी विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात घडला. त्यानंतर रेस्क्यु करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत विमानाचे अवशेष गोळा करण्यात आले. यावर विमान कंपनीचं नाव आणि क्रमांक होता. त्यावरुन यामध्ये कोण प्रवास करत होतं हे समजू शकले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून, मात्र कोणाचेही मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे.

जो लारा हे हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेते होते. १९८९  साली टारझन या मालिकेतून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांची पहिलीच मालिका तुफान गाजली. आजही प्रेक्षक त्यांना टारझन याच नावानं ओळखतात. टारझनच्या यशानंतर त्यांना चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहून दु:ख व्यक्त केल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!