🕒 1 min read
मुंबई : महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव. गेल्या अनेक वर्षापासून मांजरेकर नवनवीन विषय घेउन मराठी चित्रपटाची निर्मीती करत आले आहे. २-३ वर्षापुर्वी त्यांनी महाराष्ट्राचे लाडके पु. ल. देशपांडे यांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर आणले होते. आता स्वातंत्र्यावीर वीनायक दामोदर सावरकर यांचा जिवनपट मोठ्या पडद्यावर घेऊन ते येत आहेत. सावरकरांच्या जयंतीनिमीत्त त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली.
बॉलीवूडचे निर्माते संदिप सिंह हे या चित्रपटाची निर्मीती करणार आहेत. तर कथा ही महेश मांजरेकर आणि ऋषि विरमानी लिहीली आहे. तसेच दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलण्याचे काम हे महेश मांजरेकर करणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. ‘समाजात एकीकडे सावरकरांचा आदर करणारे असताना याच समाजात त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. जे लोक त्यांच्यावर टिका करतात त्यांना वीर सावरकराबद्दल फारशी माहिती नाही.’ असे इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहीले.
https://www.instagram.com/p/CPZz9rLJ4tY/
या पोस्टमध्ये पुढे त्यांनी ते स्वातंत्र्य लढ्यात ते महत्वाचा भाग होते. याला कोणीच नाकारु शकत नाही. या चित्रपटाद्वारे आम्ही त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र यावेळी हा चित्रपट कधी प्रदर्शीत होणार. तसेच हा केवळ मराठीत प्रदर्शित होणार का हिंदीतही याबाबतही अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मात्र अशी माहिती समोर आली आहे की महेश मांजरेकर या चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- बंदुकीचा धाक दाखवत पळवली कार; तासाभरात चोरटा पोलिसांच्या ताब्यात
- जडेजाच्या खेळीवर सातत्याने होत होत्या टीका ; धोनीने केली ‘अशी’ मदत
- अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहे- अजित पवार
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

