🕒 1 min read
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत सोबतच सिंग यांच्यावर देखील काही मंडळींनी गंभीर आरोप केल्याने त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे.
सिंग यांच्यावर क्रिकेट बुकी सोनू जालानने देखील काही गंभीर आरोप केले होते. याच प्रकरणातील एक साक्षीदार चिराग मजलानी याने पूर्वी परमबीर यांच्या पक्षात साक्ष दिली होती. पण आता एसआयटी करीत असलेल्या चौकशीत त्याने आपली साक्ष पलटवली आहे.
सन २०१७ मध्ये ठाणे खंडणीविरोधी पथकाने क्रिकेट बेटिंगमध्ये बुकी सोनू जालान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग SIT कडून सुरू आहे. यादरम्यान प्रकरणाला एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणी गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींनाही चौकशीला बोलावले जात असताना, चिराग मजलानी या साक्षीदाराने पलटी मारली आहे. त्याने ठाणे पोलिसांवरच उलट गंभीर आरोप केला आहे.
सोनुने त्याच्याविरोधात क्रिकेट बेटिंगचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आल्याचं म्हटलं होतं. या गुन्ह्याबाबत त्याने राज्याचे गृहमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर ठिकाणी तक्रार नोंदवून दाद मागितली होती. यानंतर चिराग मजलानीने आधी सोनू जालानविरोधात साक्ष दिली होती. आता त्याने पोलिस चौकशीत पोलिसांनी या गुन्ह्यात साक्षीदार बनण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी त्याचा घेतलेला जबाब हा पोलिसांनीच लिहिला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.दरम्यान,या सर्व प्रकारामुळे परमबीर सिंग यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. साक्षीदार चिरागने साक्ष पलटवल्यामुळे परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादांना मस्ती आलीये; अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने झापलं
- मान्सून लांबणीवर ? केरळात १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- छपाईच्या पलीकडं ‘वसुली सरकार’ला काहीही सुचत नाही; भाजप आमदाराची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं त्यांनाही आवडत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

