Share

‘मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं त्यांनाही आवडत नाही’

Published On: 

मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काहीसा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जूननंतर सरसकट लॉकडाऊन उठणार नाही, असं भाष्य केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील सरसकट लॉकडाऊन उठणार नसलं तरी नियमांमध्ये काहीशी शिथिलता देण्याची शक्यता देखील टोपेंनी वर्तवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी रात्री ८.३० वाजता समाज माध्यमांद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत. त्यांना नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं आवडत नाही, असं विधान शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

‘लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत नागरिकांच्या मागण्या रास्त आहेत. कारण त्यांना विविध समस्यांशी सामना करावा लागत आहे. कोणत्याच मुख्यमंत्र्याला लॉकडाऊन आवडणार नाही. पण, आवड किंवा निवड यातील एकच पर्याय निवडावा लागत आहे. निवडीचा पर्याय म्हणजे लोकांना मृत्यूपासून वाचवणं. अशातच, तिसऱ्या लाटेचा धोका लहान वयोगटातील बालकांना असल्याचं तज्ञ मंडळी सांगत आहेत. विरोधक फक्त मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचं काम करतायत. मात्र, आपले मुख्यमंत्री हे नुसते मुख्यमंत्री नाहीत, तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून वागतायत,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!