Share

‘सर्वत्र अंधार दिसत होता, ते दीड वर्ष नीट झोपू शकलो नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड मालिका होणार आहे. जून महिन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटींसाठी सामन्यांसाठी रवींद्र जडेजाचे पुन्हा टीम इंडियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले.

टीम इंडिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं सध्या भारतीय क्रिकेटपटूंना ब्रेक मिळाला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा या ब्रेकमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे. आता जडेजा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये जबरदस्त खेळ करत फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, जडेजाने एका प्रसिद्ध वृत्त वहिनीच्या मुलाखतीमध्ये त्याच्या कारकिर्दीमधील अनेक विषयांवर सविस्तर माहिती दिली आहे. ‘तू 18 महिने वन-डे आणि टेस्ट टीमच्या बाहेर होतास. त्यानंतर जोरदार पुनरागमन कसं केलंस?’ या प्रश्नाचं उत्तर देत जडेजा म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर ते दीड वर्ष माझी झोप उडाली होती. त्या काळात मी पहाटे 4-5 वाजताच उठत असे. मी पुनरागमन कसं करणार ? याचाच विचार करत होतो. मला अंथरुणावर पडलो तरी झोप लागत नव्हती. मी टेस्ट टीममध्ये होतो, पण खेळत नव्हतो. मी वन-डे खेळत नव्हतो. मी देशांतर्गत क्रिकेट देखील खेळत नव्हतो. मी टीम इंडियासोबत प्रवास करत होतो. मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळत नव्हती. मी पुनरागमन कसं करणार ? याचाच विचार करत असे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!